पीएम किसानचे पैसे खात्यात आले नाही तर इथे करा तक्रार

१५ नोव्हेंबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपयांचा १५वा हप्ता हस्तांतरित केले. ज्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला असेल. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल, ते याबाबत तक्रार करू शकतात.

असे चेक करा स्‍टेटस

पीएम किसान योजनाचा स्टेटस तपासण्यासाठी, तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटवरील “फार्मर्स कॉर्नर” विभागावर क्लिक करा. या विभागात, तुम्हाला “बेनिफिशरी स्टेटस” पर्याय सापडेल. या पर्यायावर क्लिक करा.

या नंतर, तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल. नंतर, तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल.

कॅप्चा कोड टाकल्यानंतर, तुम्हाला तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. या माहितीमध्ये, तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर, पत्ता, इत्यादींचा समावेश होतो.

तुमच्या खात्याची माहिती तपासा. जर कोणतीही माहिती चुकीची असेल, तर ती दुरुस्त करा. जर तुमचा अर्ज एखाद्या दस्तऐवजामुळे अडकला असेल, तर तुम्ही तो दस्तऐवज ऑनलाइन अपलोड करू शकता.

कशी व कुठे करायची तक्रार?
pmkisan.gov.in च्या वेब- साइटवर जा.
होम पेजवर ‘बेनिफिशरी स्टेटस’ वर क्लिक करा.
नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाका, आणि खालील कॅप्चा कोड नोंदवा.
‘गेट डाटा’ (get data) वर क्लिक करताच हप्त्याची स्थिती व पैसे न आल्याचे कारण कळेल.

इथे ई-मेल करा
योजनेच्या pmkisan-ict@gov.in या ई-मेल वर तक्रार करता येईल.

हेल्पलाइन क्रमांक
१५५२६१ / १८००११५५२६ (टोल फ्री) आणि ०११ – २३३८१०९२ वर कॉल करा.

Leave a Comment