Cotton Rate: कापसाचे भावात आज काय बदल झाला? जाणून घ्या लगेच

Cotton Rate: कापसाचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. मात्र, बाजारात कापसाचे दर हमीभावाच्या आसपासच आहेत. काही ठिकाणी तर हमीभावापेक्षाही कमी दरात कापसाची विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

अकोला बाजार समितीत आज राज्यातील सर्वाधिक कापूस दर मिळाला. प्रतिक्विंटल 7 हजार 250 रुपये इतका दर मिळाला. तर, किमान दर 7 हजार रुपये प्रतिक्विंटल होता. मांढळ बाजार समितीत आजचा सर्वात कमी सरासरी दर मिळाला. प्रतिक्विंटल 6 हजार 460 रुपये इतका आहे सरासरी दर. तर, किमान दर 6 हजार 370 रुपये प्रतिक्विंटल होता.

आज हिंगणघाट येथील बाजार समितीत कापसाची सर्वाधिक आवक झाली. 3500 क्विंटल कापसाची आवक झाली. किमान भाव 6750 रुपये तर कमाल भाव 7325 रुपये मिळाला.

आजचे कापसाचे दर

बाजार समिती – कमी दर – जास्त दर – सर्वसाधारण दर

पांढरकवडा – 6620 – 6900 – 6850

वडवणी – 7025 – 7100 – 7071

अकोला – 7011 – 7030 – 7020

पारशिवनी – 6800 – 6900 – 6850

उमरेड – 6500 – 7090 – 6800

अकोला ( बोरगाव मंजू ) – 7000 – 7500 – 7250

वरोरा – 6250 – 7221 – 6800

देउळगाव राजा – 7050 – 7170 – 7100

हिंगणा – 6400 – 6550 – 6450

वरोरा-खांबाडा – 5850 – 7150 – 6800

हिंगणघाट – 6700 – 7325 – 6900

सिंदी(सेलू) – 6900 – 7240 – 7100

मांढळ – 6350 – 6750 – 6450

वर्धा – 6800 – 7100 – 6925

पुलगाव – 6200 – 7415 – 7125

Leave a Comment