Rain: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! अवकाळी पाऊस पडल्या मुळे नुकसानभरपाई मिळणार

Weather Alert राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस पडल्या मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत दिले आहेत. शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सुमारे एक लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. गारपीटीमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने या नुकसानीची दखल घेतली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार असून जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पंचनामे करून ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या प्रकरणी नुकसान भरपाईसाठी निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळच्या बैठकीत, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले. यासाठी, सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी मागणीचे प्रस्ताव गोळा करून, एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत ट्विटर वरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे

Leave a Comment