WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Electricity: सौर वीज मिळणार! महावितरणची मोठी योजना

Solar Electricity विदर्भातील शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी आणि इतर वीज ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी करण्यासाठी, महावितरण कंपनीने मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना (एमएसकेव्हीवाय) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, विदर्भात ७९९ मेगावॅट आणि संपूर्ण राज्यात २८७० मेगावॅट सौर वीज निर्मिती केली जाणार आहे.

एमएसकेव्हीवाय-२.० ही एक योजना आहे. राज्य ऊर्जा च्या सूत्रानुसार (एमएसडीसीएल) डिसेंबर २०२५ पर्यंत केवळ शेतकऱ्यांसाठी ७००० मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्या सौर ऊर्जेमुळे कृषी क्षेत्राची ३० टक्के गरज पूर्ण होणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

एमएसकेव्हीवाय-२.० मध्ये हे चार जिल्हे आहे.
यवतमाळ (२११ मेवें.)
अकोला (१९८ मेवें.)
बुलढाणा (१४७ मेवें.)
वाशिम (१५३ मेवें.)

सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार, पहिल्या टप्यात केवळ महसुली जमिनींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जातील. या जमिनी महसूल विभागाकडून भाडेतत्त्वावर घेतल्या जातील आणि खाजगी कंपन्यांना मोफत दिल्या जातील. खाजगी शेतजमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांशी करार. शेतकऱ्यांना वार्षिक भाडे ५०,००० प्रति एकर दिले जाईल. ती रक्कम खाजगी उत्पादकांना भरावी लागेल.

२०१७ मध्ये सौर कृषी विकास योजना एमएसकेव्हीवाय-१.० लाँच करण्यात आली आणि या योजनेमुळे राज्यात सुमारे ६०६ मेगावॅट सौर ऊर्जेची भर पडली. एमएसकेव्हीवाय-१.० योजनेच्या यशामुळे, ऊर्जा मंत्रालयाने एमएसकेव्हीवाय २.० योजना लाँच केली आहे.

Leave a Comment