हरभरा, ज्वारीचे पीक घेतल्यास अनुदान मिळेल लवकर अर्ज करा?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत, रब्बी हंगामासाठी कडधान्य योजनेच्या अंतर्गत, १० वर्षांच्या आतील आणि १० वर्षांच्या वरील हरभरा बियाणे महाबीजकडून अनुदानावर उपलब्ध करण्यात येत आहे.

रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत कडधान्य योजनेतील अनुदानावर १० वर्षांच्या कालावधीत हरभऱ्याचे बियाणे ३ हजार २९४ क्विंटल तर १० वर्षां वरील ११०८ क्विंटल बियाणे महाबीजकडून उपलब्ध करण्यात आले आहे. १० वर्षांच्या कालावधीत फुले विक्रम, फुले विक्रांत, एकीजी- ११०९, बीजीएम, १०२१६ वाणांचे हरभऱ्याच्या बियाणांची २० किलोची बॅग असतील, आणि त्याची मूळ किंमत प्रति बॅग १ हजार ७०० रुपये आहे. त्यावर ५०० रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. अनुदान वजा करून, हे बॅग १२०० रुपयांना मिळणार आहे.

१० वर्षांवरील विजय दिग्विजय वाणाची बॅग २० किलोची आहे. तीची मूळ किंमत १ हजार ५४० रुपये आहे. त्यावर ३०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान वजा करुन, १ हजार २४० रुपये दराने हरभरा बियाणे महाबीजचे विक्रेते आणि उपविक्रेत्यांकडे उपलब्ध करण्यात येणार आहे.

Artificial Intelligence (AI): भविष्यातील तंत्रज्ञान जे तुमचे जीवन, नोकरी आणि व्यवसाय संपूर्णपणे बदलू शकते!

७/१२, आधार कार्ड महत्वाचे आहे.

अनुदानित हरभरा बियाणे हे एका शेतकऱ्याला ७/१२ वरील क्षेत्रानुसार जास्तीत जास्त ५ एकरसाठी ५ बॅगपर्यंत खरेदी करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक किंवा तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांकडून परमीट मिळवून इतर शेतकऱ्यांनी ७/१२ आणि आधारकार्डची झेरॉक्स प्रत देऊन अनुदानित हरभरा बियाणे खरेदी करावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.

परमिट मिळविल्यानंतर बियाणे

वर्षभर रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर; मोफत मिळेल डिस्नी प्लस, आणि हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन, जाणून घ्या एअरटेलच्या ‘या’ खास प्लॅन्सबद्दल Airtel Recharge

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर निवडलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने परमिट देण्यात येणार आहे. त्यानंतर कृषी निविष्ठा विक्रेता दुकानातून बियाणे उपलब्ध होईल. दरम्यान, बियाणे शिल्लक राहिल्यास प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना बियाणे मिळणार आहेत.

महाडीबीटी वेबसाईट:- https://mahadbt.maharashtra.gov.in/

शेतकऱ्यांना आता दुप्पट फायदा 4000 रुपये खात्यात येणार! यादीत आहे का तुमचे नाव Benificiary List

Leave a Comment