Republic Day: महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी खास पाहुणे

Republic Day: शेती ही एक अशी कला आहे ज्यात प्रयोगशीलतेची आवश्यकता असते. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी या प्रयोगशीलतेचा अवलंब करून आपली शेती इतरांसाठी मॉडेल बनवत आहेत. या शेतकऱ्यांना दिल्ली येथील प्रजासत्ताकदिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. कळंब तालुक्यातील दोन शेतकरीही या दहा शेतकऱ्यांमध्ये आहेत.

२६ जानेवारी २०२४ रोजी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिन साजरा होणार या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असतानाच कळंब तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी बातमीने आनंद व्यक्त केला जात आहेत. प्रजासत्ताकदिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून शेतकऱ्यांना स्थान राहणार आहे.

यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ‘प्रतिथेंब, अधिक पीक अर्थात सवन ड्रॉप, मोअर क्रॉप’ या संकल्पनेतून सूक्ष्म जलसिंचनाचा वापर करत प्रभावी काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच राज्यभरातील अशा दहा प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

प्रजासत्ताकदिनी विशेष अतिथी म्हणून निवड झालेल्या बापूराव नहाणे आणि त्यांच्या पत्नी सविता यांचा २४ ते २६ जानेवारी या कालावधीत तीन दिवसांचा दौरा होणार आहे. या दौऱ्याचे आयोजन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या दोन्ही व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल राज्य सरकारने विशेष अतिथी म्हणून निवडले आहे. या दौऱ्यामुळे त्यांना देशाची राजधानी पाहण्याची आणि राष्ट्रीय पातळीवरील घटनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्था करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना एसी थ्री टायर प्रवास, प्रतिदिन ९५० रुपये भत्ता आणि प्रतिदिन २ हजार २०० रुपये निवास भत्ता अनुज्ञेय राहणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पारंपरिक पोशाख आवश्यक आहे.

Leave a Comment