सोयाबीन – कापसाचा भाव जाणून घ्या सविस्तर

Cotton Rate, Today’s Cotton Price in India, Soyabean Rate Today, MCX Cotton, Agriculture News in Marathi

शेतकऱ्यांसाठी सध्याच्या पिकाचे भाव समाधानकारक नाहीत. सोयाबीनचे उत्पादन घटले तरी हमीभावाच्या आसपासच दर मिळत आहेत. सोयाबीनचे दर कमी करण्यासाठी सरकार सोयाबीन तेल आयात करत आहे. निर्यात शुल्क आणि निर्यात मुल्यात वाढ करून कांदा आयात करत आहे. कापसाचे उत्पादन कमी झाले तरी कापसाला कमी दर मिळत आहेत. वायदेबंदीला मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कापसाचे जास्तीत जास्त दर :- ₹7225

कापसाचे सर्वसाधारण दर :- ₹7100

कापसाचे कमीत कमी दर :- ₹7000

सोयाबीनचे दर गेल्या काही दिवसांपासून हमीभावाच्या आसपास स्थिर आहेत. आज बाजार समितीत सर्वाधिक म्हणजे १३ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. ४ हजार ४०१ ते ४ हजार ८८५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आजचा सरासरी दर ४ हजार २०० ते ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल आहे.

सोयाबीनचे जास्तीत जास्त दर :- ₹4650

सोयाबीनचे सर्वसाधारण दर :- ₹4300

सोयाबीनचे कमीत कमी दर :- ₹3000

केंद्र सरकारने मध्यम धाग्याच्या कापसाला ६ हजार ६४० रुपये प्रतिक्विंटल आणि लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना थेट कापूस विक्री करतात. खासगी व्यापाऱ्यांमुळे शेतकरी बाजार समितीत कापूस विक्रीसाठी येत नाहीत. आज बाजार समितीत कापसाला ७ हजार ते ७ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.

Leave a Comment