WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card: नवीन रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे!

Ration Card नवीन रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे. आता रेशनकार्डधारकांना ई-शिधापत्रिका मिळणार आहेत. यामुळे जिल्ह्यातही ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे आणि धान्याचा काळाबाजार होऊ नये, शासन पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी रेशनकार्ड काढण्यासाठीची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने ऑनलाईन रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

रेशनकार्डात ऑनलाइन बदल करा

रेशनकार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. या कागदपत्राद्वारे नागरिकांना सरकारकडून स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळतात. रेशनकार्डमध्ये बदल करणे आवश्यक असल्यास, हे आता ऑनलाइन देखील करता येते. ऑनलाईन द्वारे नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करता येणारे आहे. पत्ता बदलणे आणि रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे आदी कामे घरबसल्या करता येणारे आहे. सर्व रेशनकार्ड ई-रेशन प्रणालीवर आणले जात आहे. हे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे.

ऑनलाईन रेशनकार्ड

सरकारने रेशनकार्डांची ऑनलाईन जोडणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेशनकार्डधारकांना अनेक सोयी सुविधा मिळणार आहेत. तसेच, रेशनकार्डधारकांना त्यांच्या रेशनकार्डची माहिती ऑनलाइन पाहता येईल. सध्या रेशनकार्डांची ऑनलाईन जोडणी सुरू आहे. अनेक कार्डची ऑनलाईन जोडणी करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत सर्व रेशनकार्डांची ऑनलाईन जोडणी केली जाईल.

ई-रेशनकार्ड कोणाला मिळणार?

ज्यांना ऑफलाईन रेशनकार्ड दिली जातात त्यालाही ऑनलाईन रेशनकार्ड दिली जाणार आहे. कार्यालयात न येता ऑनलाईन प्रस्ताव दाखल करता येणारे आहे.

पडताळणीनंतर कार्ड मिळणार

ऑनलाइन रेशनकार्ड काढण्यासाठी, तुम्हाला शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. तुमचा अर्ज पुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर, ते तुमच्या अर्जाची पडताळणी करतील. जर तुमचा अर्ज योग्य असेल, तर तुम्हाला ई-रेशनकार्ड जारी केले जाईल.

Leave a Comment