Milk ATM: नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दूध उपलब्ध करून देणारी ‘मिल्क एटीएम’ संकल्पना लोकप्रिय, सुनील यांनी सोशल मीडियावर डेअरी व्यवसायासंबंधी माहिती शोधत असताना त्यांना कोल्हापूर येथील एका डेअरी फार्मचे ऑनलाइन प्रशिक्षण सापडले. त्यांनी हे प्रशिक्षण घेतले आणि डेअरी व्यवसायासाठी आवश्यक असलेली माहिती मिळवली. त्यांनी हरियाणातील हिस्सार येथून थेट दहा मुऱ्हा जातीच्या म्हशींची खरेदी केली. वाहतूक खर्चासह प्रत्येक म्हशीची किंमत 1 लाख 31 हजार रुपये होती. प्रत्येक म्हशीपासून दररोज 10 ते 12 लिटर दूध मिळते. सुरुवातीला त्यांनी हे दूध खासगी संकलन केंद्रांना विकले.
त्यांनी असे एटीएम तयार करणाऱ्या उद्योजकाचा शोध घेऊन त्याकडून 150 लिटर क्षमतेचे मशीन मागवले. मशीनसाठी त्यांना 2.5 लाख रुपये खर्च आला. शेतकऱ्याने आपल्या जनावरांसाठी साडेपाच ते सहा लाख रुपये खर्चून 33 बाय 60 फूट आकाराचा गोठा उभारला आहे. जनावरांना नियमित शुद्ध पाणी मिळावे यासाठी गोठ्यात खास वॉटर बाउल बसवण्यात आले आहेत. चाऱ्यासाठी गोठ्यात सिमेंटच्या गव्हाणी बांधण्यात आल्या आहेत. यामुळे जनावरांना चाऱ्याचे प्रमाण आणि गुणवत्ता नियंत्रित करणे सोपे होते. दूध काढण्यासाठी ‘डबल बकेट’ असलेल्या मिल्किंग मशीनचा वापर केला जातो. यामुळे दूध काढणे सोपे आणि जलद होते.
गोठ्यातील जमिनीची रचना आणि उतार योग्य प्रकारे केलेला असल्याने शेण आणि मूत्र गोठ्याबाहेर सहजतेने काढता येते यामुळे स्वच्छता राखणे सोपे होते. जनावरांच्या व्यवस्थापनासाठी परराज्यातील कुशल कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जनावरांना योग्य आहार आणि काळजी मिळते. गोठ्याची सुरक्षेसाठी शेत आणि गोठ्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. प्रति दिन 7 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यातील 3500 रुपये रोज पशुखाद्य, मजुरी व इतर खर्च होते.