Farmer Pension Scheme: पेंशन योजना काय आहे? केंद्र सरकार शेतकऱ्यांनाही पेन्शन देते. या योजनेचा उद्देश सर्वसामान्य नागरिक, मजूर आणि शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धत्वात आर्थिक सुरक्षा देणे हा आहे. प्रत्येकाला आयुष्याची संध्याकाळ आरामात घालवण्याची इच्छा असते. पण अनेकांना वाटते की नोकरी नसेल तर उतारवयात पेन्शनचा लाभ मिळू शकत नाही. पण हे खरे नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठीही पेन्शन योजना सुरू केली आहे. योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 60 व्या वर्षानंतर पेन्शनचा लाभ मिळतो.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने 31 मे 2019 रोजी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 60+ वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना दरमहा ₹3000 रुपये पेंशन देण्यात येते. एका वर्षात ₹36,000 रुपये या योजनेतंर्गत मिळतात. आतापर्यंत 4 कोटी 9 लाख 76 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. भारतीय आयुर्विमा महामंडळ योजना राबवते.
पेंशन योजनेसाठी पात्रता काय आहे? असा घ्या फायदा प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना जे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना या योजनेतंर्गत पेन्शनसाठी अर्ज करता येतो पीएम किसान मानधन योजनेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करा. या योजनेत 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणताही शेतकरी नोंदणी करू शकतो. शेतकऱ्यांनी 18 ते 40 वर्षांच्या वयात दरमहा ₹55 ते ₹200 रुपये जमा करावे लागतात. 2 हेक्टर जमीन असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, वयाचा दाखला, शेतीचे खासरा पत्र लागतात.