विमा संरक्षित शेती क्षेत्र कमी: खरीप पीक विमा योजनेत विमा संरक्षित शेती क्षेत्राच्या आकारावर नुकसानभरपाईची रक्कम अवलंबून असते. काही शेतकऱ्यांनी अतिशय कमी क्षेत्राचा विमा काढला आहे. उदाहरणार्थ, काही शेतकऱ्यांनी १ चौरस मीटर, गुंठ्याचा शंभरावा भाग, दहावा भाग इतक्या क्षेत्राचा विमा काढला आहे.
राज्यात विमा योजनांसाठी अर्ज करणाऱ्या ६,१७५ अर्जदारांची विमा संरक्षित रक्कम १०० रुपयांपेक्षा कमी असल्याचे पडताळणीत आढळून आले आहे. या अर्जदारांपैकी बहुतेक हे अल्प उत्पन्न गटातील असल्याचे सांगितले जात आहे.
२०१९ मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम कमी मिळत असल्याच्या तक्रारींवर एक शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार, जर विमा संरक्षित क्षेत्र व रक्कम जास्त असेल आणि विमा निकषांनुसार नुकसानभरपाई १ हजारांपेक्षा कमी येत असेल तर उर्वरित रक्कम राज्य सरकार भरून शेतकऱ्याला १ हजार रुपये देण्याचे ठरले आहे.
पीक विमा नुकसानभरपाई पेरणी न होणे, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पीक कापणी प्रयोग, काढणी पश्चात नुकसान. पण, जर विमा संरक्षित रक्कम ४ रुपये असेल, तर ५० टक्के भरपाई केवळ १ रुपये येईल. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार १ हजार रुपयांची भरपाई मिळणार नाही.. त्यामुळे विमा नुकसानभरपाई कमी मिळाल्याची ओरड होते.