WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Interest Rates: व्याजदर मध्ये बदल, तुमच्या आर्थिक स्थिती वर काय परिणाम होणार? जाणून घ्या

Interest Rates: डिसेंबर २०२३ मध्ये, अनेक बँकांनी त्यांच्या भांडवली खर्चावर आधारित व्याजदर (MCLR) आणि रेपो दरावर आधारित कर्ज दर (RLLR) बदलले. या बदलामुळे सर्वसामान्य कर्जदारांच्या ईएमआयमध्ये बदल दिसून येत आहे. युनियन बँक ऑफ इंडिया, IDBI बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक (PNB), कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि बंधन बँक या बँकांनी डिसेंबर महिन्यात त्यांचे व्याजदर बदलले.

IDBI बँकचे नवीन कर्ज दर –

IDBI बँकेने १२ डिसेंबर २०२३ पासून लागू होण्यासाठी कर्ज दर मध्ये बदल केली आहेत. एका दिवसासाठी कर्जाचा दर ८.३ टक्के आहे. तसेच एका महिन्याच्या कालावधीसाठी MCLR ८.४५ टक्के असून तीन महिन्यांचा MCLR ८.७५ टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR ८.९५ टक्के आहे. एक वर्षाचा MCLR ९ टक्के आहे. दोन वर्षांसाठी MCLR ९.५५ टक्के आहे. तीन वर्षांसाठी MCLR ९.९५ टक्के आहेत.

बँक ऑफ बडोदा नवीन कर्ज दर –

बँक ऑफ बडोदाने (BoB) १२ डिसेंबर २०२३ पासून त्यांचे MCLR दर बदलले आहेत. आता, एका दिवसासाठी MCLR दर ८% आहे, एका महिन्यासाठी ८.३%, तीन महिन्यांसाठी ८.४%, सहा महिन्यासाठी ८.५५% आणि एक वर्षासाठी ८.७५% आहे.

ICICI बँक नवीन कर्ज दर –

ICICI बँकेच्या वेबसाइटनुसार, १ डिसेंबर २०२३ पासून, ICICI बँकेने आपला MCLR बदलले आहेत.

नवीन MCLR दर खालीलप्रमाणे आहेत :-

एका दिवसासाठी दर – ८.५ टक्के
एका महिन्यासाठी दर – ८.५ टक्के
तीन महिन्यासाठी दर -८.५५ टक्के
सहा महिन्यासाठी दर – ८.९ टक्के
एक वर्षाचा दर – ९ टक्के

पंजाब नॅशनल बँक नवीन कर्ज दर –

पंजाब नॅशनल बँक (PNB) ने १ डिसेंबर २०२३ पासून आपल्या MCLR मध्ये बदल केले आहे. यामुळे, एका दिवसासाठी सुधारित MCLR ८.२ टक्के झाला आहे. एका महिन्यासाठी MCLR ८.२५ टक्के झाला आहे. तीन महिन्यासाठी MCLR ८.३५ टक्के झाला आहे. सहा महिन्यासाठी दर ८.५५ टक्के झाला आहे. एका वर्षासाठी PNB चा MCLR दर ८.६५ टक्के झाला आहे. तीन वर्षांसाठी दर ९.९५ टक्के झाला आहे.

बँक ऑफ इंडिया नवीन कर्ज दर –

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने १ डिसेंबर २०२३ पासून आपल्या MCLR मध्ये सुधार केली आहेत. यामुळे एका दिवसासाठी MCLR दर ७.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. एका महिन्याचा MCLR दर ८.२५ टक्के, तीन महिन्यांचा MCLR दर ८.२५ टक्के, सहा महिन्यांचा MCLR दर ८.६ टक्के आणि तीन वर्षांसाठी MCLR दर ९ टक्के आहे.

कॅनरा बँकचे नवीन कर्ज दर –

कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेने १२ डिसेंबर २०२३ पासून वेगवेगळ्या कालावधीसाठी त्यांचे MCLR दर बदलले, या बदलानुसार, एका दिवसासाठी कर्जाचा दर ८ टक्क्यांवर आला आहे. एका महिन्याचे कर्जाचे दर ८.१ टक्क्यांवर, तीन महिन्यांचे कर्जाचे दर ८.२ टक्क्यांवर, सहा महिन्यांसाठी कर्जाचा दर ८.५५ टक्क्यांवर, एक वर्षाच्या कर्जाचा दर ८.७५ टक्क्यांवर आणि दोन वर्षांच्या कर्जाचा दर ९.०५ टक्क्यांवर पोहोचले आहेत. बँकेने तीन वर्षांच्या कर्जाचा दर ९.१५ टक्के ठेवलेला आहेत. कॅनरा बँकेने RLLR मध्ये बदल केले आहे. आता १२ डिसेंबरपासून ते ९.२५ टक्के झाला आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन कर्ज दर –

युनियन बँक ऑफ इंडियाने MCLR नवीन दर ११ डिसेंबर २०२३ पासून १० जानेवारी २०२४ पर्यंत प्रभावी राहतील. एका दिवसासाठी MCLR दर ७.९ टक्के आहे. एका महिन्यासाठी MCLR दर ७.९५ टक्के आहेत. तीन महिन्यांसाठी MCLR दर ८.३५ टक्के आहे. सहा महिन्यांचा MCLR दर ८.६ टक्के आहे. एक वर्षाचा MCLR दर ८.८ टक्के आहे. दोन वर्षांचा MCLR दर ८.९ टक्के आहे. तीन वर्षांचा MCLR दर ९.०५ टक्के आहेत.

बंधन बँक नवीन कर्ज दर –

बँकेने १ डिसेंबर २०२३ पासून MCLR आधारित कर्ज दर बदलले आहे. या बदलानुसार, एक दिवसासाठी आणि एक महिन्याच्या कालावधीसाठी MCLR दर ७.०७ टक्के, तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी व्याजदर ८.५७ टक्के, एक, दोन आणि तीन वर्षांचा MCLR दर ११.३२ टक्के आहेत.

Leave a Comment