Kanya Sumangala Yojana: मुलींसाठी उत्तम भविष्य आणि आर्थिक सक्षमीकरणसाठी सरकारने नवीन योजनांची सुरुवात केली आहे. यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनेअंतर्गत, सरकार मुलींना आर्थिक मदत करत आहे. तसेच यात मुलींना शैक्षणिक मदत, लग्नासाठी आर्थिक मदत आणि इतर प्रकारची मदत करते. अशीच एक योजना म्हणजे कन्या सुमंगला योजना.
उत्तर प्रदेश सरकारने मुलींचे शिक्षण आणि भविष्य उजळण्यासाठी कन्या सुमंगला योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत, मुलींना आर्थिक मदत दिली जाते. पूर्वी, या योजनेअंतर्गत मुलींना 15 हजार रुपये दिले जात होते. मात्र, आता सरकारने या रकमेमध्ये वाढ करून 25 हजार रुपये केली आहे. यामुळे, मुलींचे शैक्षणिक भविष्य अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
या योजनेअंतर्गत, जन्मापासून ते पदवी शिक्षणापर्यंत मुलींना आर्थिक मदत दिले जातात. समाजात मुलींना समान हक्क आणि संधी मिळाव्यात यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी उत्तर प्रदेशची रहिवासी असावे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे रहिवासी प्रमाणपत्र असावे. आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, विजेचे किंवा टेलिफोन बिल हे रहिवासी प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल. यात कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींच्या नावे खाते उघडता येईल. त्या कुटुंबाचे उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
या योजनेचा लाभ त्यांनाच घेता येईल ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2019 ला किंवा त्यानंतर झाला आहे. या योजनेअंतर्गत सरकार मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत संपूर्ण खर्च उचलते. या योजनेचा उद्देश मुलींच्या हक्कांवर होणारा भेदभाव दूर करणे आणि त्यांना समान संधी निर्माण करणे आहे. या योजनेअंतर्गत, सरकार मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करते आहेत.