Karj Mafi: अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1851 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. या मदतीतून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार असून साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 177 टक्के मोठी वाढ झाली आहे. 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. राज्य सरकारने यासाठी 5174 कोटी रुपयांचा तरतूद उपलब्ध केली आहे. या पैशातून शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्यास भरपाई दिली जाईल.
मुख्यमंत्री म्हणाले, सध्या विमा कंपन्यांकडून 2 हजार 121 कोटी रुपयांची अग्रिम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी 1217 कोटी रुपये अग्रिम म्हणून वाटप करण्यात आले आहेत. गारपिट आणि अवकाळी पाऊसमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे राज्यात सुरू आहेत. 32 जिल्ह्यांपैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अकोला, परभणी, नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदिया या सहा जिल्ह्यातील पंचनामे थोडे बाकी आहेत.
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 9 लाख 75 हजार 59 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना दोन हजार कोटींची मदत दिली जाईल आणि जसजसे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदत डीबीटीद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.