WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Price: कापसाचे दर ८ हजारांच्या जवळपास!

दिवाळीपूर्वी कापसाचा भाव सात हजार रूपये प्रतिक्विंटल होता आणि दिवाळीनंतर कापसाचा भाव आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. बाजारपेठेत कापसाचा भाव प्रतिक्विंटल ७ हजार ८२५ रूपये मिळाला आहे. यामुळे कापूस उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत.

गेल्या वर्षी भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता, परंतु शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. कापूस आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खुल्या बाजारात सर्वाधिक कापूस खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा आहे. या स्पर्धेतून शेतकऱ्यांना सुरुवातीला प्रति क्विंटल ७ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला. मात्र, पुढील काळात हे दर टिकतील की नाही याची शाश्वती देता येणार नाही.

सरकीचे दर उत्पादनही घसरले

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी खुल्या बाजारातील कापसाचे दर घसरले आहेत. यामागील कारण म्हणजे सरकीचे दर आणि उत्पादन घटणे. सरकीच्या दरात घट झाल्यामुळे कापसाचे दर देखील घटले आहेत. सरकीचे दर घटण्याची कारणे म्हणजे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीतील घट आणि भारतात सरकीचे उत्पादन घटणे.

गेल्या वर्षी प्रतिक्विंटल ४२०० रुपयांच्या दराने विक्री होणारी सरकी यावर्षी ३३०० ते ३५०० रुपयांपर्यंत घसरली आहे. यातच यंदाच्या पावसाच्या खंडामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment