WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CCI Cotton: कापसाला किती भाव मिळण्याची शक्यता

कापूस उत्पादकांची सीसीआयच्या खरेदीसाठी प्रतीक्षा दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार्‍या CCI कापूस खरेदी केंद्र यंदा कधी सुरू होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. CCI कापूस खरेदीच्या प्रक्रियेमुळे खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन भाव वाढीसाठी त्याचा फायदा होतो. तसेच, सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राची प्रतीक्षा लागून आहे. दरम्यान, नंदुरबार आणि शहादा येथे केंद्र सुरु करण्याचं प्रस्ताव सुरू आहे.

दीड महिन्यापासून कापूस हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजारात आणत आहेत, परंतु भाव नसल्याने संघर्षात आहे. ही स्थिती लक्षात घेता गेल्या महिन्यात, नंदुरबार बाजार समितीने नेहमीप्रमाणे आपले खरेदी केंद्र सुरू केले. त्याच्या दोन आठवड्यांनी, शहादा बाजार समितीने आपले खरेदी केंद्र सुरू केले.

शहादा बाजार समितीने पहिल्यांदा कापूस खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांना सोयीचे झाले. या दोन्ही खरेदी केंद्रांमध्ये बऱ्यापैकी आवक सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राची प्रतीक्षा लागून आहेत. सीसीआयने जाहीर केलेल्या संभाव्य खरेदी केंद्रांमध्ये नंदुरबार आणि शहाद्याचा समावेश केला.

प्रत्येक वर्षी येथे दोन स्थळांवर CCI खरेदी केंद्र सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. हे केंद्र सुरू होऊन त्याच्या निमित्ताने खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता असते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये लवकरात लवकर सीसीआयचे केंद्र सुरू करण्याची मागणी आहे. सीसीएयच्या, कापसाला प्रति क्विंटल सात हजार रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment