WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Well Scheme: 1 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही विहिरीचा लाभ घेता येईल.

Well Scheme: रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी जमीन क्षेत्राची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. तसेच, अनुदानामध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ मिळेल आणि सिंचन क्षेत्रात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

अनुदानामध्येही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी, सिंचन विहिरीसाठी अनुदान 2 लाख रुपये होते. आता हे अनुदान 4 लाख रुपये करण्यात आले आहे. या वाढीमुळे शेतकऱ्यांना विहिर खोदणे परवडणारे झाले आहे. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल आणि त्याचा शेती उत्पादनावर सकारात्मक परिणाम होईल.

विहिरीसाठी लाभार्थ्याकडे सातबारा उताऱ्यावर किमान दीड एकर क्षेत्र असणे आवश्यक होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे सलग दीड एकर क्षेत्र असलेला सातबारा उतारा नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ नव्हता. या समस्येचे निराकरण करण्यासाठी शासनाने सिंचन विहिरीसाठी आवश्यक क्षेत्राची अट एक एकर केली आहे.

सामायिक जमिनीलगतच्या शेतकऱ्यांना जर विहीर हवी असेल तर प्रत्येकी एक-एक विहीर आता नव्या निकषामुळे मंजूर होणार आहे. त्यामुळे आता लगतच्या शेतकऱ्यालाही सिंचन विहिरीचा लाभ आहे.

Leave a Comment