WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPI आयडी बंद होणार? काय करायचे? जाणून घ्या

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारतातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट झाली आहे. गेल्या काही वर्षांत, UPI ने देशातील आर्थिक देवाणघेवाणचे चित्र आमूलाग्रपणे बदलले आहे. परंतु, UPI आयडीचा वापर करत नसलेल्या युजर्सचा आयडी बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत ७ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली.

कधीपर्यंत असेल यूपीआय आयडीची मुदत?

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) दिलेल्या सूचनांनुसार, ज्या यूपीआय आयडीचा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वापर झाला नसेल, त्या आयडीचा १ जानेवारी २०२४ पासून डीॲक्टिव्ह होईल, कोणताही वापर करता येणार नाही.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, जर एखाद्या युजरने UPI द्वारे वर्षभरात कोणताही व्यवहार केला नसेल, तर त्याचा UPI आयडी बंद करण्यात येईल. UPI ही एक डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. UPI द्वारे, युजर्स पैसे ट्रान्सफर करू शकतात, बिल भरू शकतात, आणि इतर अनेक प्रकारचे व्यवहार करू शकतात.

Leave a Comment