WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran: महावितरणच्या नवीन धोरणामुळे ग्राहकांना होईल दिलासा

शेतकरी वीज ग्राहकांनी रोहित्र जळाल्यास किंवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र बसविण्यासाठी महावितरणच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांच्या निर्देशानुसार, रोहित्र बिघडल्यास दुरुस्तीसाठी मोहीम सुरू केली आहे.

महावितरणने राज्यभर रोहित्र जळाल्यास किंवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त रोहित्र बसविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसांत बिघडलेले रोहित्र बदलले जाते. ग्राहकांनी नादुरुस्त रोहित्राबद्दल माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने महावितरणने ग्राहकांना महावितरण ॲपच्या माध्यमातून त्वरित माहिती देऊन मदत करण्याचे आवाहन केले आहे.

जळालेल्या रोहित्राच्या जागी दुरुस्त रोहित्र बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे हे महावितरणचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे रोहित्राची दुरुस्ती लवकर होण्यास मदत होईल. दुरुस्त रोहित्राचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले जात आहे. रोहित्र बदलणे आणि दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालयस्तरावर दररोज घेण्यात येत आहे. यामुळे रोहित्र बदलण्याच्या प्रक्रियेतील अडचणी ओळखून त्या दूर करण्यात मदत होईल.

महावितरणने रोहित्र बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर कमीत कमी तीन दिवसात ते बदलण्याची मोहीम सुरू केली आहे. तथापि, रोहित्र जळाले आहे हे उशिरा समजल्यास, प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागतो. त्यामुळे ग्राहकांनी ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती महावितरणला त्वरीत ॲपवर द्यावी,

1) मोबाईलवरून महावितरण तक्रार कशी करावी

2) आपल्या मोबाईलवर महावितरण हे ॲप उघडा, नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा आणि या बटणावर क्लिक करा.

3) ग्राहकाचे नाव व नंबर दिसेल त्यावर क्लिक करा.

4) ट्रान्सफॉर्मरजवळची खूण कोणती आहे आणि कधीपासून रोहित्र बंद झाले आहे आणि रोहित्रात कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा.

5) ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा.

6) नोंद करा किंवा सबमिट हे बटण क्लिक करा.

7) ट्रान्सफॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल आणि ती नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्व्हरमध्ये केली जाईल.

8) बिघडलेले ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल.

9) ट्रान्सफॉर्मर बदलल्यानंतर ग्राहकाला एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल.

10) अधिकृत वेबसाइट:- https://www.mahadiscom.in/

Leave a Comment