WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price: एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात; दिवाळीनंतर ग्राहकांना दिलासा

दिवाळीच्या काही दिवस आधी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र आता यावर दिलासा मिळाला आहे. इंधन कंपन्यांनी गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत.

इंधन कंपन्यांनी (OMCs) १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५७.५० रुपयांची कपात केली आहे. यामुळे नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

दिवाळीपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०१.५० रुपयांची वाढ झाली होती. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.

काय आहे नवीन दर?

१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १७५५.५० रुपये, कोलकात्यात १८८५.५० रुपये, मुंबईत १७२८ रुपये आणि चेन्नईमध्ये १९४२ रुपये प्रति सिलिंडर झाली आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरचे किमती काय?

देशातील प्रमुख शहरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कोणताही बदल झालेला नाही. १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत दिल्लीत ९०३ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये प्रति सिलिंडर आहे.

Leave a Comment