WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pradhan Mantri Matru Vandana Yojana: प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमुळे सरकार कडून गर्भवती महिलांना मिळणारे फायदे

Pradhan Mantri Matru Vandana Yojana: महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनांमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या जिवंत अपत्यासाठी 5,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दोन टप्प्यांमध्ये दिले जाते. या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून आता दुसरे अपत्य मुलगी असेल तरीही या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेचा उद्देश महिलांना गर्भधारणेच्या काळात आणि बाळाच्या जन्मानंतर आवश्यक असलेले पोषण आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळून त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे होईल. राज्यात सांगली जिल्हा योजना राबविण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ओळखपत्राची एक प्रत जोडणे आवश्यक आहे.
1) तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी असावे.
2) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला असावे.
3) महिला आंशिक 40% किंवा पूर्ण अपंग.
4) बीपीएल शिधापत्रिकाधारक असावे.
5) आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी महिला.
6) ई-श्रम कार्ड धारक महिला.
7) PM किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी.
8) मनरेगा जॉब कार्ड धारक असावे.
9) गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका.
10) अंगणवाडी मदतनीस किंवा आशा कार्यकर्ती हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी आहे.

केंद्र सरकारच्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत गर्भवती महिलाला 5000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. हे सहाय्य दोन टप्प्यांमध्ये दिले जाते. गरोदरपणाच्या काळात मातृ व बाल आरोग्याचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आखल्या आहेत.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी गरोदर महिलांनी मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त आरोग्य संस्थेमध्ये गरोदरपणाची नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीनंतर प्रसूतीपूर्व किमान एक तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, प्राथमिक लसीकरण चक्र पूर्ण करणे आवश्यक आहेत.

नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, दुसरे अपत्य मुलगी असल्यास, त्यासाठीची रक्कम 5000 रुपये आहे. ही रक्कम बाळाच्या जन्मानंतर, जन्म नोंदणी प्रमाणपत्र आणि बाळाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळी दिली जाते. एखाद्या लाभार्थीस तिच्या दुसऱ्या गरोदरपणात एकापेक्षा जास्त (जुळे, तिळे, चौघे) अपत्ये झाली असतील तर त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील, तर तिला दुसऱ्या मुलीसाठीची रक्कम दिली जाते.

Leave a Comment