PM Kisan: 16 वा हप्ता PM Kisan सन्मान निधी योजनेअंतर्गत, 11.27 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2.8 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना 15वा हप्ता मिळाला आहे, तर 16व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा आहे. पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जातात आणि ही जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजना मानली जाते. 16 व्या हप्त्यातील 2,000 रुपये फक्त अशाच शेतकऱ्यांच्या खात्यात येतील ज्यांनी ही चार कामे पूर्ण केली आहेत. तुम्हालाही हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर स्टेप्स फॉलो करा.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 16व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले ठेवा. तुमचा DBT पर्याय तुमच्या आधार सीडेड बँक खात्यामध्ये सक्रिय ठेवा. तुमचे ई-केवायसी पूर्ण करा. पीएम किसान पोर्टलमधील (KNOW YOUR STATUS) मॉड्यूल अंतर्गत तुमचे आधार सीडिंग तपासा.
अशा प्रकारे ई-केवायसी करा पीएम किसान मोबाईल अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी करू शकतात. पीएम किसान मोबाईल अॅप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) द्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे शेतकरी ई-केवायसी करू शकतात. वेबसाइटला भेट देऊन शेतकरी OTP द्वारे ई-केवायसी देखील करू शकतात.
फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी तुम्हाला फेस ऑथेंटिकेशनसाठी कॅमेरा वापरून तुमच्या चेहऱ्याचा फोटो द्यावा लागेल आणि त्यानंतर तुमची ओळख पडताळली जाईल. तुम्हाला किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, बँक खाते आणि जमिनीची कागदपत्रे इ.