WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Talathi Result: तलाठी भरतीचा निकाल आठवडाभरात लागण्याची शक्यता! संपूर्ण माहिती वाचा

Talathi Result: तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीनुसार, सर्व जिल्ह्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टीसीएस कंपनीकडून सुरू आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 26 जानेवारीला निवडपत्रे देण्यात येतील. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी संबंधित जिल्ह्यातील कार्यालयात जाऊन निवडपत्रे घ्यावी लागतील.

तलाठी भरतीसाठी महाराष्ट्रातील साडेअकरा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज भरले होते. तलाठी पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यात 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. या परीक्षातून 4 हजार 466 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. तलाठी भरती परीक्षेत प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत उमेदवारांना आक्षेप, हरकती असल्यास त्या 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत नोंदवता येतील.

5 हजार 700 प्रश्नांच्या परीक्षेत उमेदवारांनी 2 हजार 831 प्रश्नांवर 16 हजार 205 आक्षेप नोंदविले. यापैकी 146 प्रश्नांवर घेतलेले 9 हजार 72 आक्षेप योग्य ठरले आहेत. कंपनीने 146 प्रश्नांमध्ये चुका दुरुस्त केल्या. त्यानंतरही, आक्षेपांवर विचार केल्यानंतर, सात आक्षेप मान्य करण्यात आले. यामुळे, ही प्रक्रिया लांबल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार आणि आक्षेपांमुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे निकालाला विलंब होत असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, ही प्रक्रिया 26 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 26 जानेवारीला निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्रे देण्यात येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment