WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, सरकार देणार 95% अनुदान

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत त्यांच्या शेतात सिंचन करण्यासाठी राज्य सरकार सोलरपंप उपलब्ध करत आहे. जुने इलेक्ट्रिक पंप आणि डिझेल सोलर पंपमध्ये रूपांतरित करण्याची देखील सुविधा देण्यात अलेली आहे. महाराष्ट्र शासनाकडून नवीन सौर पंप बसवण्यासाठी अनुदान दिले जात आहे.

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana या योजनेअंतर्गत, राज्य सरकार पंपाच्या किमतीच्या 95% अनुदान देते. लाभार्थ्यांना फक्त 5% अनुदान भरावे लागते. महाराष्ट्र शासनाकडून या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना सौर पंप प्रदान केले जातात. 5 एकरपेक्षा कमी शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांना 3 एचपी पंप आणि जास्त शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांना 5 एचपी पंप प्रदान केले जातात.

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, सरकार पुढील तीन वर्षांत एक लाख सोलर पंप बसवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. शेतकऱ्यांनी सौर पॅनल बसवूनही पुरेशा प्रेशरने वीज मिळत नसल्यामुळे सिंचनाला पाणी देण्यासाठी वाट पाहावी लागते. शेतकऱ्यांनी सांगितले, कृषी पंपासाठी वीज मिळत नाही आणि सौरपंप दिले तरीही ते चालत नाही.

महाऊर्जाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवली जाते. यासाठी अर्ज यंत्रणाकडेच करावा लागतो. यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांकडून सौर ऊर्जेचा दाब मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. महाऊर्जाकडून सांगण्यात आले की, शेतकऱ्यांनी सौर पॅनलवरील धूळ धुवून काढणे आवश्यक असते. बोरवेलचे पाणी खेचण्याची पंपाची क्षमता 200 फुटापर्यंतच असते, याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

Leave a Comment