Mahadbt Farmer: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 अंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या अभियानांतर्गत मशरूम उत्पादन, फुलपिक लागवड, शेडनेट हाऊस, हरीतगृह, टॅक्टर, प्लास्टिक मल्चिंग, शेतकरी अभ्यास दौरा, 20 एचपी, सामूहिक शेततळे, कांदाचाळ, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, पॅक हाऊस आणि प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादी घटकांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 23 लाख रुपये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 3 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहेत. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी 23 लाख रूपये आणि अनुसूचित जमातीसाठी 3 लाख रूपये निधी प्राप्त झाला आहेत. अर्जासाठी महा-महाडीबीटीचे संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडा.
लॅपटॉप, संगणक, सीएससी (सामुदायिक सेवा) किंवा ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमांद्वारे ऑनलाइन अर्ज करता येतात. महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, आठ अ, बँक पासबुक, सातबारा आणि आधारकार्ड लिंक मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लाडके यांनी सांगितले, इच्छुक असणारे शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर विविध प्रकारच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावे.
ऑनलाइन अर्ज
मागासवर्गीय शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाने एकात्मिक उत्पादन विकास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. कृषी विभागाने शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी संग्राम केंद्रातही मदत उपलब्ध आहे.