WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price: खुशखबर गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

LPG Gas Cylinder Price: नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शुक्रवारी देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आल्याने सरत्या वर्षाच्या अखेरीस छोटे दुकानदार आणि हॉटेलमालकांना मोठा दिलासा मिळाला. 39.50 रुपयांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेली नाही.

साधारणपणे, गॅस सिलिंडरच्या दरात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल करण्यात येते. या बदलानुसार, सिलिंडरचे दर वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. मात्र, यावेळी गॅस सिलिंडरचे दर ख्रिसमस सणाच्या आधीच कमी करण्यात आले. गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 39.50 रुपयांनी कपात केली. यामुळे दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1757 रुपयांवर आली, यापूर्वी ही किंमत 1796.50 रुपये होती. 19 किलोच्या सिलेंडरची किंमत कोलकातामध्ये 1868.50 रुपयांवर पोहोचली आहे.

व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स, बेकरी, इत्यादी व्यावसायिक संस्थांना त्यांच्या खर्चामध्ये काही प्रमाणात घट होईल. यापूर्वी, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही कपात करण्यात आली होती. यामुळे घरगुती ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला होता.

मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर 1,710 रुपयांना मिळेल. चेन्नईमध्ये 19 किलोचा एलपीजी सिलिंडर आता 1929 रुपयांना विकले जाणार. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर 1 डिसेंबर रोजी वाढवण्यात आले होते. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी झाले, पण घरगुती एलपीजी सिलिंडरचे दरत बदल झाला नाही. महाराष्ट्रात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 902.5 रुपये, पश्चिम बंगालमध्ये 929 रुपये, दिल्लीत ही किंमत 903 रुपये, तर चेन्नईत 918.5 रुपये आहे.

Leave a Comment