WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड जाणून घ्या कसे मिळवायचे आणि कागदपत्रे काय लागतात

Kisan Credit Card: भारत हा कृषीप्रधान देश असून येथील अर्थव्यवस्थेचा पाया शेतीवर आहे. देशातील शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. दिवस रात्र, हिवाळा उन्हाळा, शेतकरी कष्ट करून आपल्या देशाला अन्नधान्याची कमतरता भासू देत नाहीत. शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात दुष्काळ, पूर, कीटकनाशकांची किंमत, बाजारभाव कमी होणे, कर्जाचा बोजा यांचा समावेश होतो. या समस्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेशी आर्थिक मदत मिळत नाही. यामुळे त्यांना कर्ज घ्यावे लागते. परंतु, कर्ज घेतल्यानंतर ते परत करणे अनेक शेतकऱ्यांसाठी कठीण होते. त्यामुळे ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात. अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड हा एक प्रकारचा क्रेडिट कार्ड आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी, कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि इतर कृषी संबंधित खर्चासाठी कर्ज दिले जाते. याद्वारे शेतकऱ्यांच्या कृषी गरजा पूर्ण केल्या जाते.

किसान क्रेडिट कार्ड कसे बनवावे?

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी प्रथम, तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल. वेबसाइटवर गेल्यावर किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा. फॉर्म भरणे आणि फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या जवळच्या बँकेत सबमिट करा. बँकेकडून तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाईल. तुमच्या जवळच्या बँकेतूनही फॉर्म मिळवू शकता.

कर्जासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत

अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचे पॅनकार्ड
अर्जदाराची पासपोर्ट आकाराचा फोटो
शपथपत्र: यामध्ये तुम्ही इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले नसल्याची माहिती असते.

किसान क्रेडिट कार्डचे जबरदस्त फायदे

किसान क्रेडिट कार्डधारक शेतकरी 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. या कर्जावरील मूळ व्याजदर 9 टक्के आहे. मात्र, सरकारने 2 टक्के सबसिडी दिली आहे. वेळेपूर्वी व्याज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 3 टक्के सबसिडी देते. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 4 टक्के व्याज भरावे लागते.

Leave a Comment