WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG गॅस सिलिंडर स्वस्त मिळणार? कोट्यवधी ग्राहकांना दिलासा मोदी सरकारचा मोठा निर्णय

LPG Gas Cylinder Price In Maharashtra, gas cylinder price today

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. सरकारकडून गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी वाढविण्यावर विचार सुरू आहे. ही सबसिडी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी गॅस ग्राहकांना आर्थिक फायदा मिळेल.

सरकार उज्ज्वला योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. वाढत्या महागाईमुळे गरीब लोकांना आर्थिक समस्या येत आहेत. यामुळे सरकार महागाई कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने आरबीआयला महागाई दर 4 ते 6 टक्क्यांदरम्यान ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एका वर्षात 12 सिलिंडरवर ₹300 रुपयांची सबसिडी मिळते. दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ₹903 रुपये आहे. मात्र ही सबसिडी मिळाल्यानंतर, लाभार्थ्यांना हे सिलिंडर ₹603 रुपयांना मिळते.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी गॅस सबसिडीत वाढ केली. या निर्णयामुळे 9.6 कोटी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसवर मिळणारी ₹200 रुपयांची सबसिडी ₹300 रुपये प्रति सिलिंडर झाली. यामुळे या कुटुंबांना दर महिन्याला ₹100 रुपयांची मदत होईल. हा निर्णय पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आला होता.

Leave a Comment