Gas Cylinder Price: डिसेंबरच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढवले आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात, तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत १०१.५० रुपयांची वाढ केली होती. या महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत २१ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे किंमत १७४९ रुपये झाले आहे.
घरगुती गॅस सिलिंडर दर –
१४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात केली होती. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
डिसेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. मुंबईत गॅस सिलिंडरचे दर ९०२.५० रुपये, चेन्नईमध्ये ९१८.५० आणि कोलकात्यात ९२९ रुपये आहेत. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरचे दर ७०३ रुपये आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडर दर –
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत डिसेंबर २०२३ च्या पहिल्याच दिवशी वाढ झाली आहे. मुंबई सिलिंडरची किंमत १७२८ रुपयांवरून १७४९ रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १७७५.५० रुपयांऐवजी १७९६.५० रुपयांना उपलब्ध आहे. चेन्नईतही व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत २६.५ रुपयांनी वाढ झालेली आहे. कोलकाता येथे व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १८८५.५० रुपयांवरून १९०८ रुपयांपर्यंत वाढली आहे.