WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Rickshaw: महाराष्ट्र सरकार दिव्यांग शेतकऱ्यांना ई रिक्षा मोफत देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा

Electric Rickshaw: महाराष्ट्र सरकार दिव्यांग व वित्त विकास महामंडळामार्फत मोफत ई-रिक्षा योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना शंभर टक्के अनुदान देऊन ई-रिक्षा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे अनेक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता आलेला नाही. त्यामुळे, दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधिमंडळ यांनी राज्य सरकारकडे अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.

मोफत रिक्षा मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया? ज्या दिव्यांग व्यक्तींनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी 01 एप्रिल 2024 रोजी सुरू होणाऱ्या पुढील अर्ज प्रक्रियेचा लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत 100 टक्के अनुदानावर अपंगांना ई-रिक्षा वितरित केल्या जात आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षांपर्यंत असावे आणि त्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असावे. तसेच, अर्जदाराचा 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, बँक पासबुक, रेशन कार्ड, यूडीआयडी कार्ड यासारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. याव्यतिरिक्त, जातीचा दाखला देखील जोडणे आवश्यक आहे. ओळखीसाठी पुरावा देखील जोडला जातो. या कागदपत्रांवर आधारित, दिव्यांग व्यक्तींना खाद्यपदार्थ, किराणा, स्टेशनरी, पूजा साहित्य, किरकोळ वस्तू भांडार, रद्दी भंगार वस्तू, फळाचे दुकान, भाजीपाला, प्रसाधने, मोबाइल दुरुस्ती, झेरॉक्स सेंटर, विविध स्वतंत्र व्यवसाय, वाहतूक व्यवसाय इत्यादी व्यवसाय करण्यास पात्रता मिळते.

दिव्यांग व्यक्तींना मोफत रिक्षा मिळवण्यासाठी 3 डिसेंबर 2023 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. या अर्जासाठी 8 जानेवारी 2024 ही अंतिम मुदत होती. मात्र, सध्या ऑनलाइन अर्ज भरताना अनेक अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अर्ज करू इच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना वेळ मिळावा यासाठी संघटनेच्या वतीने मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्ज प्रक्रिया सुरळीत सुरू होण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर नवीन मुदत जाहीर करण्यात येईल.

Leave a Comment