Flipkart Axis Bank Credit Card & Flipkart Loan: पैशांची गरज प्रत्येकाला कधी ना कधी येते. अशा वेळी नातेवाईक किंवा मित्रांकडून मदत मागणे हा एक सोपा मार्ग असतो. मात्र, कधीकधी नातेवाईक किंवा मित्रांना मदत करण्याची क्षमता नसते. अशा वेळी कर्ज काढणे हा एक पर्याय असतो.
जर तुम्हाला कुणाकडूनही पैसे उधार घेण्यास लाज वाटत असेल, तर फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक चांगली ऑफर घेऊन आले आहे. यामध्ये, युजर्सना 2 तासांच्या आत 50 हजार रुपये ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. अॅक्सिस बँकेडून तुम्हाला हे कर्ज ऑफर (offer) करण्यात येत आहेत. काय करावे लागेल? कसे प्राप्त करायचे हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
कर्जसाठी काय करावे लागेल?
1) तुम्हाला कर्ज घेण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
2) तुम्हाला फ्लिपकार्टच्या ई-कॉमर्स वेबसाइटवर जावे लागेल आणि वैयक्तिक कर्ज विभागात जावे लागेल.
3) यानंतर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर प्रविष्ट करायचा आहे.
4) त्यानंतर तुमच्या फोनवर OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला पडताळणीसाठी द्यावा लागेल.
5) तुम्हाला कर्ज घेण्यासाठी पॅनकार्ड आणि जन्मतारीख ही आवश्यक कागदपत्रे आहेत. त्याची माहिती द्यावी लागेल.
6) नंतर अॅक्सिस बँकेची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
7) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला 50 हजार जास्तीत जास्त 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
8) केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमच्या खात्यात 2 ते 12 तासांत पैसे जमा केले जातील.
काय अटी आहेत?
अॅक्सिस बँक कर्ज हे फक्त अॅक्सिस बँकेचे ग्राहकांना दिले जाते. या कर्जासाठी काही कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे. ज्यात तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पगाराचा दाखला, बँक स्टेटमेंट आणि इतर संबंधित कागदपत्रे यांचा समावेश आहे. तसेच, कर्ज देताना तुमचा व्यवसाय किंवा नोकरी, तुमचा उत्पन्न आणि यापूर्वी कर्ज कधी घेतले यासारख्या गोष्टींबद्दल माहिती द्यावी लागेल. हे कर्ज एका प्रकारचे वैयक्तिक कर्ज असेल.