WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली

राज्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच, राज्य सरकार केंद्र सरकारकडे तातडीने मदतीची विनंती करणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील दुष्काळाची स्थितीची माहिती दिली. या माहितीनुसार, राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या १३.४ टक्के घट झाली आहे. याचा परिणाम रब्बी पेरण्यांवर झाला आहे. आतापर्यंत केवळ १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार, दुष्काळाची स्थिती निश्चित करण्यासाठी अनिवार्य आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेतले जातात. या निर्देशांकांनुसार, राज्यातील १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचे आढळून आले आहे. या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या मदती देण्यात येईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील कमी पाऊस झालेल्या मंडळांबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे. या मंडळांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर आवश्यक ते निकष निश्चित करून योग्य त्या सवलती देण्याचा निर्णय घ्यावा. दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल.

Leave a Comment