WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

31 डिसेंबरपर्यंत ही 5 कामे न केल्यास होईल मोठे नुकसान!

1) स्टेट बँक ऑफ इंडिया:- (SBI) ची विशेष FD योजना, SBI अमृत कलश योजनेची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपत आहे. 400 दिवसांच्या या FD योजनेवर उपलब्ध कमाल व्याज दर 7.60% आहे. या विशेष एफडी डिपॉझिटवर, मॅच्युरिटी व्याज आणि टीडीएस कापून ग्राहकाच्या खात्यात जमा केले जातील.

2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया:- (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (SBI), बँक ऑफ बडोदा (BoB) सह इतर बँकांमध्ये लॉकर घेणार्‍या ग्राहकांसाठी, सुधारित लॉकर करार टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठी एक अलर्ट देखील आहे. डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.असे केले नाही तर तुम्हाला लॉकर सोडावे लागू शकते. 31 डिसेंबरपर्यंत बँक लॉकर करारावर 100 टक्के ग्राहकांच्या स्वाक्षऱ्या घेणे RBI ने अनिवार्य केले आहे.

3) UPI खाते बंद होऊ शकते:- UPI हे आजकालच्या काळात सर्वात लोकप्रिय पेमेंट पद्धतींपैकी एक आहे. Google Pay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm सारख्या अनेक अॅप्स UPI द्वारे पैसे पाठवणे, पैसे घेणे आणि पेमेंट करणे सुलभ करतात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. NPCI ने असे UPI ID निष्क्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे, जे गेल्या 1 किंवा त्याहून जास्त वर्षांपासून वापरले जात नाहीत तर तो 31 डिसेंबर 2023 रोजी निष्क्रिय होईल.

4) आयटीआर:- हे आयकर रिटर्न फॉर्म म्हणजे करदात्याने भारताच्या प्राप्तिकर विभागाला त्याच्या वार्षिक उत्पन्नाची आणि आर्थिक स्थितीची माहिती देण्यासाठी वापरले जाणारे दस्तऐवज आहे. शेवटची तारीख 31 जुलै 2023 होती. मात्र, काही कारणास्तव जर तुम्ही आयकर भरण्याची तारीख चुकली असाल तर तुम्हाला आताही 31 डिसेंबरपर्यंत आयकर भरता येईल. यासाठी तुम्हाला विलंब शुल्कासह आयकर भरावा लागेल. विलंब शुल्काबाबत सांगायचे तर, तुमचे उत्पन्न 5,00,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत विलंब शुल्क भरावे लागेल. तर उत्पन्न 5,00,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास तुम्हाला 1000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.

5) म्युच्युअल फंड:- गुंतवणूक करताना नामांकन करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी 31 डिसेंबर ही तारीख महत्त्वाची आहे. या तारखेला नॉमिनी जोडण्याची अंतिम मुदत संपत आहे. जर तुम्ही या मुदतीत नॉमिनी जोडू शकला नाही, तर तुमचे म्युच्युअल फंड खाते गोठवले जाऊ शकते.

Leave a Comment