भारतातून युरोपला पहिल्यांदाच सागरी मार्गाने केळ्यांची निर्यात केली जात असून. यासाठी कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतीय केळ्यांना युरोपच्या बाजारात आणखी जास्त भाव मिळावा या उद्देशाने महत्त्वाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, आयएएस उपस्थित होते.
महाराष्ट्रातून युरोपला केळी निर्यात करण्याचा कार्यक्रम हा भारतीय कृषी निर्यात क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरला. अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स, आयएनआय फार्म्स प्रा. लि. या महाराष्ट्रातील निर्यातदाराने एकूण १९.५० मेट्रिक टन केळी निर्यात केल्या. महाराष्ट्रातील वासुंदे, बारामती-कुरकुंभ रोड, दौंड, पुणे येथील निर्यातदाराच्या पॅकहाऊसमधून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आल्या.
मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या मार्गे सागरी मार्गाने केळ्यांची निर्यात सुरू होईल. निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी, अत्यंत सुनिश्चित पद्धतीने अपेडाकडून, महाराष्ट्रातील मेसर्स, आयएनआय फार्म्स प्रा. लि. या निर्यातदार कंपनीला संपूर्ण पाठबळ प्रदान करण्यात आले. यामुळे भारताच्या केळी निर्यातीच्या क्षेत्रात नवीन अध्याय सुरू झाला.
यावेळी, दिल्लीच्या मुख्यालयातील ‘फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल (FFV Division) महाव्यवस्थापक विनिता सुधांशू आणि मुंबईच्या प्रादेशिक कार्यालयातील प्रमुख व उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, राज्य सरकारचे इतर उच्च अधिकारी, केळी निर्यातदार, प्रगतीशील केळी उत्पादक शेतकरी, आणि आयएनआय फार्म्सचे प्रतिनिधी येथे उपस्थित होते.
भारतीय कृषी उत्पादनाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये स्थान प्राप्त करण्यासाठी अपेडाची वचनबद्धता या ऐतिहासिक कार्यक्रमांमध्ये घडवली आहे. युरोपला केळी निर्यात करण्याचा प्रायोगिक प्रयत्न हा निर्यात क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि युरोपीय बाजारपेठेतील भारताचे स्थान बळकट करण्यासाठी अपेडा अतिशय सक्रियपणे काम करत आहे.