Airtel Job: देशात आयटी क्षेत्राची मागणी वाढत आहे. अनेकजण आयटीला करिअर म्हणून निवडतात आणि इंडस्ट्रीत करिअर करण्याचे स्वप्न अनेकांना असते. मात्र, एका संशोधनातून, येत्या वर्षी ४० टक्के फ्रेशर्सची नियुक्ती कमी होण्याची शक्यता आहे. टीमलीज च्या डेटनुसार आयटी क्षेत्र 2023 च्या तुलनेत 40% कमी फ्रेशर्सची नियुक्ती करेल. याचा अर्थ असा की आयटी क्षेत्र 2023 मध्ये 2,50,000 अभियंते ऑनबोर्ड नियुक्त झाली. आयटी कंपन्या नेहमी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात त्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया सुरू करतात. परंतु, या प्लेसमेंट सीझनमध्ये कॅम्पसमध्ये उपस्थित राहिल्या नाहीत. यामुळे, महाविद्यालयीन पदवीधरांची नियुक्ती थांबली आहे.
आयटी क्षेत्रात नवीन पदवीधरांना नोकरी मिळणे कठीण होत आहे. एअरटेल, एअरटेल बिझनेस, होम्स, मोबिलिटी, एअरटेल डिजिटल आणि एनक्सट्रा या कंपनीने आपल्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी देशभरात 100 हून अधिक महाविद्यालय कॅम्पस मधून 700 पदवीधरांना हायर करण्यासाठी सज्ज आहे. यामुळे नवीन पदवीधरांना नोकरी मिळण्याची संधी वाढणार आहे. यासाठी कंपनीने महाविद्यालयांमधील कॅम्पस भर्ती कार्यक्रमांचा विस्तार करत आहे. यामध्ये सेल्स, इंजिनियरिंग आणि बिझनेस सोल्युशन्स यासारख्या क्षेत्रातील नोकऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र हे एअरटेलसाठी महत्त्वाचे टॅलेंट हब बनलेला आहेत. कंपनीने राज्यातील अनेक नामांकित महाविद्यालयांशी भागीदारी केली आहे. यामध्ये सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल अँड टेलिकॉम मॅनेजमेंट, कमिन्स पुणे, के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सिम्बायोसिस सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एससीआयटी), एससीएमएचआरडी, वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, एनएमआयएमएस, एसआयबीएम, एनआयटीआयई, एसपी जैन, के.के. वाघ इंस्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च आणि भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग यांचा समावेश आहे.
तरुणांना त्यांच्या करिअरला गती देण्यासाठी अनेक कंपन्या विविध कॅम्पस प्रोग्राम्स आयोजित करतात. या प्रोग्राम्समधून तरुणांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार आणि कौशल्यांनुसार नोकरीच्या संधी मिळतात. कॅम्पस प्रोग्राम्समधून मिळालेले नवीन नियुक्त्यांना संस्थेमध्ये विविध पदांवर नोकरीच्या संधी आहेत. यामध्ये एरिया मॅनेजर, प्रोडक्ट मॅनेजर, की अकाउंट मॅनेजर, टेरिटरी सेल्स मॅनेजर, नेटवर्क इंजिनियर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सोल्यूशन आर्किटेक्ट आणि एनओसी इंजिनियर्स यांचा समावेश आहे.