Agriculture Technology: शेती हा भारतातील एक प्रमुख व्यवसाय आहे. शेतीसाठी लागणारी औषधे, खते आणि इतर पदार्थ फवारणीद्वारे पिकावर लावल्या जातात. परंतु, फवारणी करताना शेतकऱ्यांना अनेक धोके असतात. जसे की, विषारी रसायनांमुळे विषबाधा होणे, फवारणी यंत्रामुळे इजा होणे, आणि उष्णतेमुळे आरोग्य बिघडणे.
योगेश यांनी फवारणी यंत्रांची निर्मिती करून आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या आईकडून काही पैसे घेऊन एक प्राथमिक पातळीचे फवारणी यंत्र बनविले. त्यानंतर त्यांनी सतत संशोधन आणि विकास केला. त्यांनी पहिल्या यंत्रातील त्रुटी दूर केल्या आणि फवारणीचे काम अधिकाधिक सुलभ कसे करता येईल यासाठी नवीन सुधारणा केल्या.
फवारणी यंत्रे त्यापैकी काही प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत
मानवचलित यंत्राला फिरवण्यासाठी, चालवण्यासाठी, किंवा नियंत्रित करण्यासाठी मानवी शक्तीची आवश्यकता असते. या यंत्रात २४ लिटरची टाकी आहे आणि त्याची किंमत १० हजार रुपये आहे.
बॅटरी चलित यंत्रात मानवी शक्तीऐवजी बॅटरी आणि मोटरची ऊर्जा वापरली आहे. यामुळे हा यंत्र अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम बनला आहे. या यंत्राची किंमत १२ हजार रुपये आहे.
टू इन वन यंत्रात मानवी ऊर्जेने किंवा बॅटरीने शेती फवारणी करण्यासाठी दोन्ही पर्याय आहेत. जर तुम्ही बॅटरीने यंत्राचा वापर करत असाल आणि काही क्षेत्र फवारून तुमची बॅटरी संपली, तर तुम्ही ते क्षेत्र पूर्णपणे फवारू शकता दोन्ही पर्याय आहेत. यंत्राची किंमत १४ हजार रुपये आहे.
इंजिनचलित यंत्रात दोन एचपी इंजिन आहे. त्यामुळे हे यंत्र चालवणे सोपे झाले आहे. यामुळे आंब्यासारख्या उंच झाडांवरही फवारणी करणे शक्य झाले आहे. या यंत्राची किंमत ३० हजार रुपये आहे.
सौरऊर्जेवरील यंत्राला सौरऊर्जेचा वापर करून चालवले जाते. बॅटरीवर चालणाऱ्या यंत्रांपेक्षा हे यंत्र अधिक वेळ चालू राहते. बॅटरीवर चालणारे यंत्र तीन तासांनी बॅटरी संपल्यामुळे बंद पडते, तर सौरऊर्जेवर चालणारे हे यंत्र पाच तास सुरू राहते.
सर्व यंत्रे एका चाकावर चालणारी आहेत, मानवचलित यंत्राला इंधनाची गरज नसते, या फवारणी यंत्राद्वारे सुमारे ४० मिनिटांत एक एकर क्षेत्राची फवारणी करता येते. या यंत्रात आडवी आणि उभी अशी दोन्ही पद्धतींनी फवारणी करता येते. यामुळे पाच ते सहा फूट उंच असलेल्या पिकांसह उंच मांडव असलेल्या वेलवर्गीय पिकांतही फवारणी करता येते.