WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card Update: आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत संपणार, १४ डिसेंबरपर्यंत करा हे काम

Aadhar Card Update: आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. याचा वापर शाळा प्रवेश, बँक खाते उघडणे, सरकारी योजनांचा लाभ मिळवणे, इत्यादी अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातो. त्यामुळे आधार कार्ड अपडेट ठेवणे महत्त्वाचे आवश्यक आहे. आधार कार्ड जारी करणाऱ्या संस्थे, UIDAI ने नागरिकांना आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही १४ डिसेंबर २०२३ पर्यंत आधार अपडेट करू शकता.

१० वर्षे जुने आधार अपडेट करणे आवश्यक

आधार कार्ड हे आजकाल प्रत्येकासाठी आवश्यक ओळखपत्र आहे. अशा परिस्थितीत अनेक प्रकारे फसवणुकीची प्रकरणे समोर येतात. UIDAI कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून नागरिकांना वाचवण्यासाठी लोकांना १० वर्षे व त्याहून जुने आधार कार्डचे अपडेट करण्याचा सल्ला देते.

विनामूल्य आधार अपडेट करता येणार

UIDAI च्या वेबसाईटवर उपलब्ध केलेल्या माहितीनुसार, त्यांची बायोमेट्रिक माहिती, नाव, मोबाइल नंबर, लिंग, पत्ता, पिन इत्यादी सारखे डेटा कोणत्याही अडचणीशिवाय सहजपणे ऑनलाइन अपडेट करूशकतात. यासाठी, वापरकर्ताला वेगळे शुल्क भरावे लागणार नाहीत. मोफत आधार अपडेटची सुविधा फक्त ऑनलाइन अपडेटवर उपलब्ध आहे, परंतु आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल.

मोफत आधार ऑनलाइन अपडेट कसे करायचे

1) तुम्ही यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट वर जा.

2) यानंतर आधार अपडेटचा पर्याय निवडा.

3) जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील पत्ता बदलायचा असेल, तर तुम्हाला अपडेट अॅड्रेसचा हा पर्याय निवडावा लागेल.

4) मोबाईल क्रमांक टाकल्यावर, तुम्हाला येथे ओटीपी टाकावा लागेल.

5) अपडेट करण्यासाठी Documents Update पर्यायावर क्लिक करा.

6) आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी संबंधित तपशील दिसतील.

7) जर सर्व तपशील अचूक असतील तर, पत्ता अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

8) आधार अपडेट प्रक्रिया पूर्ण कारा.

9) तुम्हाला १४ अंकीचा अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल.

10) तुम्ही आधार अपडेट प्रक्रियेचा मागोवा घेऊ शकता.

Leave a Comment