WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kisan Credit Card Loan: आता मिळेल 3 लाख रुपयांचं कर्ज सर्वात कमी व्याजदर! शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना

Kisan Credit Card Loan: शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना पैसे लागते. तसेच त्यांना अनेकदा व्याजाने पैसे उधार घ्यावे लागतात. या अडचणीचा फायदा घेऊन काही लोक शेतकऱ्यांना जास्त व्याजदराने पैसे देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत होत्या. शेतकऱ्यांच्या या अडचणी ओळखून केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे. या कार्डद्वारे शेतकरी आपल्या गरजेनुसार कर्ज घेऊ शकतात. शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास, त्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळते. शेतीसाठी इतर कोणत्याही योजनेत इतके स्वस्त कर्ज उपलब्ध नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी मोहीम राबवत आहेत. या अंतर्गत, कोट्यवधी कर्जाचं वाटप करण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 4 टक्के वार्षिक व्याजावर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. शेतीव्यतिरिक्त मत्स्यपालन किंवा पशुसंवर्धनशी संबंधित लोकांनाही समाविष्ट करण्यात आले. या अंतर्गत त्यांना केवळ 2 लाख रुपयांचे कर्ज मिळते. यातील 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध आहेत.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदराने ऋण दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले साहित्य आणि खते खरेदी करता येईल. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी मदत होईल.

Kisan Credit Card बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1) ओळखपत्र (अर्जदाराचे ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स).

2) किसान क्रेडिट कार्डसाठी (KCC) भरलेला अर्ज.

3) पत्ता पुरावा (अर्जदाराचा पत्ता पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स).

4) पासपोर्ट फोटो (अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे).

5) बँक काही विशिष्ट परिस्थितीत इतर कागदपत्रे देखील मागू शकते.

6) जमिनीची कागदपत्रे.

Leave a Comment