WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Price: नकाशा आणि सात-बारासह रेडीरेकनरचे दर आता घरबसल्या पाहता येणार!

Land Price: तुम्ही खरेदी करत असलेल्या जमिनी किंवा फ्लॅटचे मूल्य ठरवण्यासाठी सरकारने रेडीरेकनर दर ठरवले आहेत. या दरांवर नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काची गणना केली जाते. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग लवकरच एक नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधामुळे तुम्हाला तुमच्या जमिनी किंवा फ्लॅटचे रेडीरेकनर दर नकाशा आणि सात-बारा उताऱ्यासह पाहता येतील. यामुळे तुम्हाला तुमच्या जमिनी किंवा फ्लॅटचे अचूक मूल्य कळेल आणि तुम्हाला नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काची योग्य गणना करता येईल.

महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये डिसेंबरअखेर रेडीरेकनर दर नकाशे उपलब्ध होतील. या नकाशांवरून नागरिकांना घरबसल्या रेडीरेकनर दर पाहता येतील. यामुळे नागरिकांची फसवणूक टळण्यास मदत होईल. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग दरवर्षी रेडीरेकनर दर जाहीर करतात. हे दर जिल्हा, तालुका व गट क्रमांकानुसार विभागाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळतात. आता हेच दर एखाद्या गटाच्या किंवा इमारतीच्या नकाशासह उपलब्ध होतील. नागपूर मधील महाराष्ट्र प्रादेशिक सुदूर संवेदन केंद्राची मदत घेणार. राज्यातील सर्व जिल्हे, तालुके व गटनिहाय नकाशे उपलब्ध आहे.

शहरातील किंवा शहराजवळील जमिनी खरेदी करताना अनेकदा नागरिकांची फसवणूक होते. जमिनी ग्रीन झोनमध्ये आहे की नाही हे समजत नाही. यासाठी, संबंधित गटाचा नकाशा, रेडीरेकनर दर आणि सात-बारा उतारा या कागदपत्रांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये जमिनीचा वापर विभाग आणि त्याची रचना याची माहिती दिलेली असते. त्यामुळे, जमिनी खरेदी करण्यापूर्वी या कागदपत्रांचा अभ्यास करून खात्री करणे आवश्यक आहे.

Leave a Comment