Sukanya Samriddhi Yojana: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सरकारने सुकन्या समृद्धि योजनेतील गुंतवणूकदारांना भेट दिली आहे. या योजनेसाठी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी व्याजदर वाढवून 8.2 टक्के केला आहे. या योजनेत आधी गुंतवणूकदारांना 8 टक्के व्याज मिळत होते. मात्र, सरकारने इतर योजनांच्या व्याजदरांमध्ये वाढ केली नाही. सरकारने नवीन वर्षाच्या आधी स्मॉल सेविंग स्कीमच्या व्याजदरात वाढ करून गुंतवणूकदारांना भेट दिली आहे.
यामुळे सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सुकन्या समृद्धि योजनेसाठी जानेवारी ते मार्च तिमाही दरम्यान व्याजदर 8% वरून वाढवून 8.2% करण्यात आला आहे. यामुळे सुकन्या समृद्धि योजनेतील गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळेल. तसेच मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी आवश्यक असणारा पैसा जमा करणे सोपे होईल.
दुसऱ्यांदा वाढले व्याजदर – या आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरांमध्ये दुसऱ्यांदा वाढ झाली आहेत. यापूर्वी पहिल्या तिमाहीत सरकारने व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8 टक्क्यांवर नेले होते. त्यामुळे या आर्थिक वर्षात या योजनेच्या व्याजदरांमध्ये 0.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
फिक्स्ड डिपॉझिट स्कीमच्या व्याजदरांमध्ये वाढ – सुकन्या समृद्धी योजनासह तीन वर्षांच्या मुदतीच्या ठेवीवर सध्याची व्याजदर 7% वरून 7.1% पर्यंत वाढणार आहे. तसेच, पीपीएफ आणि बचत ठेवींवरील व्याजदर अनुक्रमे 7.1% आणि 4 टक्के वर कायम ठेवण्यात आला आहे.
किसान विकास पत्रवरील (KVP) व्याजदर 7.5 टक्के मिळतो. KVP ची मुदत 115 महिने आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) या वरील व्याजदर 1 जानेवारी ते 31 मार्च 2024 कालावधीसाठी 7.7 टक्के व्याजदर मिळतो. मासिक आय योजना (एमआइएस) व्याजदर (7.4 टक्के) आहेत आणि यात कोणतीही वाढ झालेली नाही.