Government Scheme For Girls Lek Ladki Yojana: सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची योजना सुरु केली आहे. या नवीन योजनेचे नाव लेक लाडकी योजना आहे. या योजनेअंतर्गत केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डधारक कुटुंबात 1 एप्रिल आणि नंतरच्या जन्मलेल्या मुलींना 1 लाख रुपयांचा लाभ देण्याची योजना जाहीर केली आहे.
या योजनेनुसार, मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला शासनाकडून रोख रक्कम देण्यात येईल. ही रक्कम 75 हजार रुपये आहेत. मुलींच्या जन्मदर वाढवणे आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने1ऑगस्ट 2017 रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली होती. मात्र, सरकारने राबवलेल्या या योजनेला हवा तितका प्रतिसाद मिळाला नाहीत. त्यामुळे, राज्य सरकारने ही नवीन योजना लेक लाडकी योजना सुरु केली आहेत.
योजनेत, केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबात 1 एप्रिल 2023 रोजी व नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना लागू होणार. या योजनेंतर्गत मुलींच्या खात्यात टप्प्याटप्प्याने 1 लाख 1 हजार रुपये पाठवले जातील.
या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे मुलींचे शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण करणे. या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता कमी होईल. तसेच, या योजनेमुळे समाजातील लिंगभेद कमी होण्यास मदत होईल. लेक लाडकी योजना ही गरीब कुटुंबातील मुलींसाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेमुळे मुलींचे शैक्षणिक आणि आर्थिक भविष्य उज्ज्वल होईल.
आवश्यक कागदपत्रे –
या योजनेसाठी अर्ज करताना, तुम्हाला ही कागदपत्रे आवश्यक आहेत. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, मुलीचा जन्मदाखला, बँकेचे पासबुक, आई-वडिलांचे आधार कार्ड, शाळेचा दाखला आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रे लागतील.