Gram Panchayat Mahaegram Citizen Connect: ग्रामपंचायतींकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी आता घरबसल्या अर्ज करता येणार आहेत. यासाठी महा ई-ग्राम सिटिझन अॅप उपलब्ध करण्यात आलेला आहे. या अॅपवरून दाखले काढण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात ७९ हजार ९० लोकांनी विविध दाखले घरबसल्या काढले होते. या अॅपमुळे लोकांना ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याची गरज नाहीत. ते घरबसल्याच आपल्या मोबाईलवरून अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभाग आणि पंचायत राज विभागामार्फत महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचे एक मोबाइल अॅप उपलब्ध केले आहे. हे अॅप जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध आहे.
अॅपमुळे ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमध्ये जाऊन दाखले मिळवण्यासाठी वेळ आणि पैसा वाचतो. तसेच, ग्रामपंचायतीमध्ये दाखले मिळवण्यासाठी होणारा गर्दीचा त्रासही कमी झाला आहे. या अॅपमुळे ग्रामपंचायतींनाही गृहकर वसुली सोपी झाली आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थ घरबसल्या गृहकर भरू शकतात.
कोणते दाखले मिळणार आहेत
अॅपद्वारे नागरिकांना घरबसल्या विविध प्रकारची प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे मिळू शकतात. यामध्ये दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, पीएम विश्वकर्मा, ग्रामपंचायत स्तरावरून मिळणारे विविध दाखले, महात्मा फुले योजना, ई-श्रमकार्ड आणि योजनांचा लाभासाठी आवश्यक कागदपत्रे यांचा समावेश आहे.
अॅप कसे इन्स्टॉल करायचे
आपल्या मोबाइल फोनवर प्ले स्टोअर उघडा. महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाची अॅप शोधा आणि इन्स्टॉल करा. अॅप उघडा आणि रजिस्टर बटणावर करा. आपल्या नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीसह आवश्यक माहिती भरा आणि त्यानंतर युजर पासवर्ड द्वारे लॉग इन करा.